दिलबहार जेता , बालगोपाल उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलबहार जेता , बालगोपाल उपविजेता
दिलबहार जेता , बालगोपाल उपविजेता

दिलबहार जेता , बालगोपाल उपविजेता

sakal_logo
By

87193 ः ६ कॉलम फोटो
---
87191, 87191
---
सतेज चषक ‘दिलबहार’कडे
---
अंतिम सामन्यात टाय ब्रेकरवर विजय; बालगोपाल तालीम मंडळ उपविजेता
कोल्हापूर, ता. ५ : शुभम घराळेच्या उत्कृष्ट गोलरक्षणाच्या जोरावर अंतिम सामन्यात टाय ब्रेकरवर दिलबहार तालीम संघाने ३-१ अशा गोलफरकाने विजय मिळवत सतेज चषकावर नाव कोरले; तर झुंजार खेळ करणारा बालगोपाल तालीम मंडळ संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, रोहित पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी भूपाल शेटे, विनायक फाळके, राजू लाटकर, डॉ. भरत कोटकर, शरद माळी, संपत जाधव, राजेंद्र ठोंबरे, संदीप सरनाईक उपस्थित होते.
तत्पूर्वी, अंतिम सामन्याचे उद्‍घाटन संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित (कै.) पांडबा जाधव व (कै.) रावसाहेब सरनाईक स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली.    
अंतिम सामना अटीतटीचा ठरला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी गोल नोंदविण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले. पूर्वार्धात एकही गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून अधिक आक्रमक खेळ झाला. बालगोपाल संघाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक ‘दिलबहार’चा गोलरक्षक शुभम घराळे याने लीलया अडवत ‘बालगोपाल’चा प्रयत्न फोल ठरविला. ‘दिलबहार’च्या स्वयंम साळोखे याने ६१ व्या मिनिटाला गोलरक्षकाला चकवत गोल नोंदवून सामन्यात १-० गोलने आघाडी घेतली. या पाठोपाठ सामन्याच्या ७० व्या मिनिटाला ‘बालगोपाल’च्या प्रतीक पोवार याने मैदानाच्या मध्यातून थेट गोल जाळीत चेंडू फटकावत उत्कृष्ट गोलची नोंद केली. यासह सामना पूर्णवेळेत पुन्हा एक गोल बरोबरीत राहून टाय ब्रेकरवर खेळविण्यात आला.
‘दिलबहार’चा गोलरक्षक शुभम घराळे याने प्रत्यक्ष सामन्यात पेनल्टीसह दोन, तर टाय ब्रेकरमध्ये तीन गोल अडवत विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यात त्याने अडवलेले प्रत्येक गोल हे अवघड असेच होते.
दरम्यान, ‘दिलबहार’चा गोलरक्षक निखिल खाडे प्रदीर्घ आजारातून बाहेर पडल्यावर स्वस्थ होऊन मैदानावर पोचला. संघाने सामना जिंकताच त्यानेही बसलेल्या जागेवरून आनंद व्यक्त केला. मात्र, संपूर्ण संघाने त्याला खांद्यावर घेऊन मैदानभर विजयी फेरी मारल्याने निखिलही भारावून गेला. 

असा झाला टाय ब्रेकर 
दिलबहार                          बालगोपाल 
सनी सणगर - अडविला  ******  प्रतीक पोवार - अडविला  
सचिन पाटील - गोल ******* ऋतुराज पाटील - अडविला 
प्रमोदकुमार पांडे - बाहेर ****** आशिष कुरणे - गोल 
संडे ओबेम - गोल *********** अभिनव साळोखे - अडविला 
सुमीत घाटगे - गोल 

स्पर्धेतील उत्कृष्ट 
डिफेन्स - केल्विन - बालगोपाल ८७१९८ 
गोलरक्षक - परमजीत बाघेल - बालगोपाल ८७१९८
हाल्फ - रोहित देसाई -  पीटीएम ८७२००
फॉरवर्ड - मोहम्मद खुर्शीद - दिलबहार ८७२०१ 
मालिकावीर  - शुभम घराळे - दिलबहार ८७२०२