ऋतुराज पाटील बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतुराज पाटील बातमी
ऋतुराज पाटील बातमी

ऋतुराज पाटील बातमी

sakal_logo
By

इनडोअर स्टेडियम
उभारण्यासाठी निधी
देऊः ऋतुराज पाटील

साने गुरूजी वसाहत​, ता. ५ : ​क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील प्रलंबित विकासकामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावू. या परिसरात इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी भरीव निधी देवू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. स्थानिक विकास ​निधीतून रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या ​सुरुवाती प्रसंगी ते बोलत होते.
​​आमदार पाटील यांच्या स्थानिक विकास निधिमधून क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील विशाल नगर​, सुलोचना पार्क ​ या ठिकाणच्या रस्ता काँक्रिटीकरणाला सुरुवात करण्यात आली.शारंगधर देशमुख, किरण पाटील​, ​अभिजित चव्हाण, अभिजीत देठे, गजानन विभूते​,​धनंजय बोंगाळे, नंदकुमार पिसे, युवराज तेली, नितीन मगदूम, निवास नलवडे, अनिल चव्हाण, सागर दळवी, रमेश गुरव, प्रशांत पोवार, संभाजी बळीप, मनोहर पाटील, उमेश वेसनेकर, मनोहर पेटकर उपस्थित होते.