Tue, March 28, 2023

महावितरण आवाहन
महावितरण आवाहन
Published on : 10 March 2023, 2:39 am
शनिवार, रविवार
वीजबिल भरणा
केंद्र राहणार सुरू
कोल्हापूर : ग्राहकांना चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील शनिवारी व रविवारसह सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, महावितरण मोबाईल अॅप या ''ऑनलाईन'' पर्यांयाद्वारे वीज बिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.