ताराराणी विद्यापीठसह ‘एसथ्री अकॅडमी विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताराराणी विद्यापीठसह 
‘एसथ्री अकॅडमी विजयी
ताराराणी विद्यापीठसह ‘एसथ्री अकॅडमी विजयी

ताराराणी विद्यापीठसह ‘एसथ्री अकॅडमी विजयी

sakal_logo
By

ताराराणी विद्यापीठसह
‘एसथ्री अॅकॅडमी विजयी
कोल्हापूर सॉकर क्लब वूमन्स फुटबॉल चॅम्पियनशिप 
कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर सॉकर क्लबच्या वतीने महिलांसाठीच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टर्फ मैदानावर झालेल्या या सिक्स साईड वूमन्स फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये चौदा वर्षांखालील व खुला गट असे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत १४ संघांनी सहभाग नोंदवला. 
चौदा वर्षांखालील वयोगटात ‘ताराराणी विद्यापीठ’ तर खुला वयोगटात ‘एसथ्री अॅकॅडमीने’ विजेतेपद पटकावले.
ताराराणी विद्यापीठ संघाने कणेरी संघावर १ - ० अशी मत केली. खुल्या गटात ‘एस थ्री अॅकॅडमी’ने कोल्हापूर सॉकर क्लब संघावर १-० अशा गोलफरकाने विजय मिळवला. विजेत्यांना यशस्विनीराजे छत्रपती यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी अनुजा पाटील, विश्‍वास कांबळे, संभाजी पाटील- मांगोरे, लालासो गायकवाड, उषादेवी गायकवाड, पृथ्वी गायकवाड उपस्थित होते.
--------------
वैयक्तिक बक्षिसे
वैभवी कानडे - ताराराणी विद्यापीठ
सौम्या कागले - (खुलागट) एसथ्री सॉकर ॲकॅडमीय

प्लेअर-ऑफ-द टूर्नामेंट
जानवी ढेरे कणेरी
निकीता (खुलागट) एसथ्री सॉकर अकॅडमी

बेस्ट गोलकीपर
चंदना भेंडेकर ताराराणी विद्यापीठ
साक्षी जाधव (खुलागट) कोल्हापूर सॉकर क्लब