हिरकणी इलेव्हन विजयी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरकणी इलेव्हन विजयी.
हिरकणी इलेव्हन विजयी.

हिरकणी इलेव्हन विजयी.

sakal_logo
By

वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत हिरकणी इलेव्हन विजयी
कोल्हापूर, ता. १२ : सरदार स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगी वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत हिरकणी इलेव्हन संघाने विजय मिळवला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. उद्घाटन आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा जोशी, के.आय.टी कॉलेजच्या प्रा. अश्विनी शिंदे यांच्या हस्ते व हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, जिल्हा हॉकी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय साळोखे- सरदार, हॉकी प्रशिक्षक मोहन भाडंवले,नजीर मुल्ला ,सागर जाधव व अमित शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना महाराणी येसूबाई विरुद्ध महाराणी ताराराणी या संघांमध्ये झाला. सामना महाराणी येसूबाई संघाने ३ विरुद्ध ० गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना हिरकणी इलेव्हन विरुद्ध महाराणी ताराराणी संघांमध्ये झाला. हा सामना हिरकणी संघाने चार ४ विरुद्ध ० शून्य गोलने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा अंतिम सामना महाराणी येसूबाई विरुद्ध हिरकणी इलेव्हन या संघांमध्ये होऊन हिरकणी संघाने २ विरुद्ध ० गोलने विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजेत्यांना माजी राष्ट्रीय हॉकी खेळाडू कविता साळोखे , कल्पना भोसले व जया शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.