Wed, March 29, 2023

जागतिक वन दिन
जागतिक वन दिन
Published on : 18 March 2023, 1:29 am
‘जंगल आणि आदिवासी समाज’
विषयावर गुरुवारी परिसंवाद
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त ‘जंगल आणि आदिवासी समाज’ विषयावर २३ मार्चला परिसंवाद होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र, पर्यावरणशास्त्र अधिविभाग व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन केले आहे. मानव्यशास्त्र सभागृहात सकाळी साडे दहा वाजता त्यास सुरवात होईल. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ- डॉ. प्रकाश राऊत, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड व श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संपत देसाई प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करतील. परिसंवादास विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक वंचितता केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी केले आहे.