Thur, June 8, 2023

राजाराम महाविद्यालयात व्याख्यान
राजाराम महाविद्यालयात व्याख्यान
Published on : 25 March 2023, 6:07 am
राजाराम महाविद्यालयात व्याख्यान
कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती अंतर्गत तनुजा शिपूरकर यांचे ‘विशाखा मार्गदर्शिका २०१३’ विषयावर व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. वाय. सी. अत्तार अध्यक्षस्थानी होत्या. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात त्याचे आयोजन केले होते. या वेळी श्रीमती शिपुरकर यांनी कायद्यासंदर्भात असणाऱ्या विविध बाबी, पैलू, तरतुदी व भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. हा कायदा समजून सांगत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विषयांसंदर्भात अनेक दाखले दिले. प्रा. संदीप पाटील, प्रा. संदीप गाडे, प्रा.अर्चना पाटील, प्रा. अनिता बोडके, प्रा. दिपाली धावणे उपस्थित होते. प्रा. सुशांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. क्रांती पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. टी. के. उदगीरकर यांनी आभार मानले.