दिलबहार उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलबहार उपांत्य फेरीत
दिलबहार उपांत्य फेरीत

दिलबहार उपांत्य फेरीत

sakal_logo
By

लोगो - चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा
94482, 94483
कोल्हापूर : चद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार विरूध्द फुलेवाडी यांच्यातील सामन्यातील एक क्षण. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

दिलबहार उपांत्य फेरीत 
फुलेवाडी संघावर टायब्रेकरमध्ये विजय; चुरशीच्या सामन्यात ४ विरुद्ध २ गोल
कोल्हापूर, ता. ८ : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघावर टायब्रेकरमध्ये ४ विरुद्ध २ गोल फरकाने विजय मिळवला. श्री नेताजी तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम वर सुरू आहे.
दिलबहार तालीम विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला. दरम्यान सामन्याच्या १६ व्या मिनिटाला दिलबहारच्या सुमित घाटगे यानं कॉर्नर किकद्वारे दिलेल्या पासवर राहुल तळेकर याने हेडद्वारे गोल नोंदवत संघाला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली. फुलेवाडी संघाकडून आक्रमक चाली रचण्यात आल्या मात्र यश आले नाही. सामन्याच्या उत्तरार्धात फुलेवाडी संघाने अधिक आक्रमक चाली रचत गोल केला सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला विराज साळोखे याने दिलेल्या पासवर अजय जाधवने हेडद्वारे गोल नोंदवत फुलेवाडी संघाला सामन्यात परत आणले. दरम्यान, फुलेवाडीच्या रोहित मंडलिक याने फ्री किकवर गोलजाळीच्या दिशेने फाटकावलेला चेंडू दिलबहारचा गोल रक्षक शुभम घराळे याने अडवला. यानंतर काही वेळाने दिलबहारचा संडे ओबेम याने गोल जाळीच्या दिशेने फाटकवलेला चेंडू फुलेवाडीचा गोल रक्षक रणवीर खालकर याने अडवला. अखेर सामना पूर्णवेळ एक गोल बरोबरीत राहिला. 
-------------
सामनावीर 
राहुल तळेकर - दिलबहार 
--------------
आजचा सामना
संध्याकाळी ४ जुना बुधवार पेठ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ
------------
टायब्रेकर असा
दिलबहार*फुलेवाडी 
पावन माळी - गोल*अक्षय मंडलिक - अडवला 
सचिन पाटील - गोल*अरबाज पेंढारी - गोल 
सनी सणगर - गोल*संदीप पोवार - गोल
संडे ओबेम - गोल*सिद्धार्थ यादव - अडवला