पीपल्स आर्ट सेंटर कार्यक्रम

पीपल्स आर्ट सेंटर कार्यक्रम

फोटो- चेचर सर देतील.
...

राजर्षींकडून लोककल्याणकारी
कार्यातून धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार

डॉ. जयसिंगराव पवारः पीपल्स आर्ट्स सेंटरतर्फे मान्यवरांचा सन्मान

कोल्हापूर, ता. २ : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लोककल्याणकारी कार्यातून राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला’, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. शाहू राजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पीपल्स आर्ट्स सेंटर मुंबईतर्फे राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित १०४६ व्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्या ४२ व्यक्तींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. हॉटेल सयाजी येथे कार्यक्रम झाला.
डॉ. पवार म्हणाले, ‘पिल्ले मूळचे केरळचे असून, त्यांनी महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सन्मान करणे, ही विशेष बाब आहे. देशाची एकात्मता अखंडित राहावी, यासाठी ते करत असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. गेली ४५ वर्षे ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी सक्रिय आहेत. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता एकात्मता टिकवणे आव्हान आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू राजांचे विचार समाजात रूजवून समाजात एकोपा निर्माण करणे आवश्यक आहे.’

या वेळी उद्योजक संजय घोडावत, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके, समरजितसिंह घाटगे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे, वैद्य अशोक वाली, पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर, कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील, टेनिसपटू ऐश्वर्या जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतिश पत्की, बांधकाम व्यावसायिक अभिजीत मगदूम, जाफरबाबा सय्यद, वस्ताद आनंदराव ठोंबरे, ॲड. प्रशांत चिटणीस, सचिन शानभाग, विजय मेनन, अभिनेता विलास रकटे, डॉ. विनोद ठाकुरदेसाई, प्राणी मित्र धनंजय जाधव, युवा दिग्दर्शक स्वप्नील यादव, आर्टिस्ट अतुल डाके यांच्यासह विविध क्षेत्रातील ४२ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. गोपकुमार पिल्ले यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी भोईर यांनी सूत्रसंचालन केले. राजेश जगताप यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com