रुफ टाॅप सोलर

रुफ टाॅप सोलर

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे
ग्राहकांना झिरो वीज बिल
जिल्ह्यात ४६३ पैकी साठ टक्के जणांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : सौर ऊर्जा प्रकल्प बसविलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४६३ ग्राहकांपैकी साठ टक्के ग्राहकांचे वीज बिल झिरो येत असल्याचे चित्र आहे. उर्वरित ग्राहकांना केवळ तीस टक्के वीज बिल येत असून, सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्याचा फायदा त्यांना अनुभवायला मिळत आहे.
केंद्राच्या ४० टक्के अनुदान योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ४६३ घरगुती ग्राहकांनी १८१९ किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला साधारणपणे दोन लाख १८ हजार युनिटची वीज निर्मिती होत आहे. आर्थिक मूल्यानुसार महिन्याकाठी ६ लाख ७० हजार रुपयांची वीज निर्मिती ग्राहक करत आहेत.
राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी घट झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॉट वीज निर्मिती क्षमता गाठली आहे. रूफ टॉप सोलरमुळे सोसायटीच्या छतावर निर्माण झालेली वीज सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचे पंप, इमारतीतील जिने व पार्किंग येथील सार्वजनिक दिवे या कामांसाठी वापरली जाते. सोसायटीच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मीटरिंगद्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते. महावितरणला सोसायटीकडून मिळणाऱ्या विजेच्या बदल्यात सोसायटीच्या वीजबिलात कपात होते.
------------------
दृष्‍टिक्षेपात
- हाऊसिंग सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी महावितरणतर्फे मदत
- महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart संकेतस्थळावर त्याची संपूर्ण माहिती उपलब्ध
- गृहनिर्माण संस्थांना ५०० किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी २० टक्के अनुदान
- ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com