अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी तिघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी तिघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीची छेडप्रकरणी तिघांवर गुन्हा

मुलींनी दिला बेदम चोपः खासबाग मैदानजवळील प्रकार

कोल्हापूर, ता. ३१ : शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला. दुपारी खासबाग मैदान येथे हा प्रकार घडला. यावेळी मुलींनीही या तिघांना बेदम चोप दिला. श्रेयस माळी, रोहित क्षीरसागर, अमोल कांबळे यांच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस विवेक वोरा हे आज दुपारी कामानिमित्त खासबाग मैदान येथे गेले होते. यावेळी संशयित तिघे जण एका अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वोरा यांनी तिघांना अडवून जाब विचारला. त्यावेळी तिघांनी वोरा यांना शिवीगाळ केली. हा प्रकार तिथे उभ्या असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. यावेळी वोरा आणि तेथील नागरिकांनी या तिघांनाही चोप दिला. हे पाहून तेथील मुलींनीही या तिघांना बेदम मारले. त्यानंतर तिघांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवरही छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com