तलाठी परीक्षा बातमी

तलाठी परीक्षा बातमी

वेळ बदलल्याने तलाठी परीक्षेत गोंधळ
सर्व्हर डाऊन ः परीक्षार्थींना करावी लागली दोन तासांची प्रतीक्षा

कोल्हापूर, ता. २० : सर्व्हर डाऊन झाल्याने आज तलाठी परीक्षेच्या पहिल्या सत्राचा पेपर दोन तास उशिरा घेण्यात आला. सकाळी नऊचा पेपर दुपारी अकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत थांबावे लागले. परीक्षेची पुढची सत्रेही नियोजित वेळांपेक्षा उशिरा सुरू झाली. त्यामुळे परीक्षार्थींच्यात गोंधळ निर्माण झाला. आज तीनही सत्रात मिळून २ हजार ७४१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.
तलाठी पदासाठी राज्यात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा होत आहे. रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाते. जिल्ह्यात तलाठीपदाच्या ५६ जागांसाठी सुमारे ४९ हजार १८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. टीसीएस कंपनी परीक्षेचे संचालन करत आहे. ही परीक्षा तीन सत्रांमध्ये घेतली जाते. पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी नऊ वाजता होते. आज मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने नऊ वाजता पेपर सुरू झाला नाही. राज्याच्या मुख्य केंद्रातून जिल्ह्यातील सर्व केंद्रांना ९ वाजता होणारा पेपर दुपारी ११ वाजता घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे वेळेवर परीक्षा केंद्रात आलेल्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास ताटकळत थांबावे लागले. जिल्ह्यात एकूण आठ केंद्रांपैकी सहा केंद्रांवर आज परीक्षा झाली. पहिले सत्र ११ ते १, दुसरे सत्र २ ते ४ आणि तिसरे सत्र ५.३० ते ७.३० या कालावधीत झाले. तीनही सत्रात मिळून २ हजार ७४१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.
---

जिल्ह्यात आठ केंद्रे
जिल्ह्यामध्ये तलाठी परीक्षेसाठी आठ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक तहसीलदार, एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून, शिपाई व कर्मचारी असा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. तसेच तंत्रज्ञ आणि टीसीएस कंपनीचे प्रतिनिधीही प्रत्येक केंद्रावर उपस्थित असतात.
---
पारदर्शकतेसाठी खबरदारी
परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय बायोमेट्रिक पद्धतीचाही अवलंब केला जातो. परीक्षा केंद्रावर जामर बसवल्याने मोबाईल किंवा तत्सम कोणतेही उपकरण सुरू होऊ शकत नाही.
---
तलाठी परीक्षेच्या सप्टेंबरमधील तारखा
१, ४, ५, ६, ८, १०, १३, १४
---
कोट ....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com