कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी पदी

कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी पदी
Published on

14698 - कार्तिकेयन एस.

जिल्हा परिषद ‘सीईओ’पदी
कार्तिकेयन यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्तिकेयन पुण्यात २४ फेब्रुवारी २०२४ ला रुजू झाले होते. महिना पूर्ण होण्याआधी त्यांची कोल्हापूरला बदली झाली आहे.
पाटील यांनी २५ जुलै २०२३ ला मुख्य कार्यकारीपदाची सूत्रे स्वीकारली होती. आज त्यांच्या बदलीचा आदेश आला‌. त्यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागेवर कार्तिकेयन यांची वर्णी लागली आहे. कार्तिकेयन २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. चार्टर्ड अकाउंटंटचे व्यावसायिक कौशल्य त्यांच्याकडे आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com