शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

75356
कोल्हापूर : शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
...............
लोगो ः शिवशाहू चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा

शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

‘वेताळमाळ’चा टायब्रेकरवर ३-१ ने पराभव; मयूरेश चौगले ठरला ‘विजयाचा शिल्पकार’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शिवशाहू चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळावर टायब्रेकरवर ३ विरुद्ध १ गोलफरकाने मात करत अंतिम फेरीत आज प्रवेश केला. गोलरक्षक मयूरेश चौगलेने ‘वेताळमाळ’चे तीन फटके रोखले. तो ‘शिवाजी’च्या विजयाचा शिल्पकार ठरला. पूर्णवेळेत ‘वेताळमाळ’च्या खेळाडूंनी सूत्रबद्ध खेळ करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सामना सुरू होताच ‘वेताळमाळ’ला पहिली कॉर्नर किक मिळाली. मात्र, त्यांना त्याचा फायदा उठवता आला नाही. ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरेने ‘वेताळमाळ’च्या गोल जाळीसमोरून हेडद्वारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न फसला. त्यानंतर लगेचच त्यांच्या इंद्रजित चौगुलेला गोल करण्याची सोपी संधी होती. मात्र, त्याने चेंडूला चुकीच्या दिशेने फटका मारल्याने ती दवडली. इंद्रजितच्या कॉर्नर किकच्या पासवर करणने ३० व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ‘वेताळमाळ’कडून सर्वेश वाडकरने गोलरक्षक मयूरेशला चकवत ३१ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. या गोलचा धक्का ‘शिवाजी’च्या खेळाडूंना सहन झाला नाही. त्यांनी पुन्हा आक्रमक चढायांवर भर दिला. दहा मिनिटांनंतर त्यांच्या करणला गोल करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्याने ४० व्या मिनिटाला गोल केला.
उत्तरार्धात ‘शिवाजी’च्या इंद्रजित चौगुलेने चेंडू घेऊन थेट ‘वेताळमाळ’च्या गोलजाळीच्या दिशेने चाल केली. त्याने चेंडूला थेट गोलजाळीच्या दिशेने जोरदार फटका लगावला. तो ‘वेताळमाळ’च्या गोलरक्षकाने तटवून गोलजाळीसमोर ढकलला. या परतलेल्या चेंडूवर खुर्शीद अलीने ४३ व्या मिनिटाला गोल केला. या वेळेत ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी चढाया केल्या असल्या तरी त्यांचे दिशाहीन फटके आणि पास देण्यातील ढिलाई नडली. ‘वेताळमाळ’कडून प्रथमेश पाटीलने ५५ व्या मिनिटाला गोल करत इरादे स्पष्ट केले. पुन्हा
‘वेताळमाळ’कडून आकाश माळीने ६८ व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. ‘शिवाजी’कडून योगेश कदम, जय कामत यांनी बचावफळीत चांगला खेळ केला.
.............
ाअसा झाला टायब्रेकर :
‘शिवाजी’ ‘वेताळमाळ’
* सुयश हांडे - गोल * प्रथमेश पाटील - तटवला
* रोहन आडनाईक - तटवला * प्रणव कणसे - गोल
* खुर्शीद अली - गोल * संदीप पोवार - तटवला
* करण चव्हाण-बंदरे - गोल * साहिल निंबाळकर - तटवला
------------------
सामनावीर
मयूरेश चौगुले (शिवाजी तरुण मंडळ)

लढवय्या खेळाडू
प्रथमेश पाटील (वेताळमाळ तालीम मंडळ)
..........
आजचा सामना
पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध जुना बुधवार सेवाभावी संस्था, वेळ ः दुपारी ४ वाजता.
.....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com