वानखेडे व्याख्यान

वानखेडे व्याख्यान

80635
...

कोल्हापूरला हिंदुत्वाची कार्यशाळा बनवू नका
अशोक वानखेडे ः ‘संविधान व लोकशाही’वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : ‘मंदिरांवर की माणसांवर लक्ष देणारे सरकार हवे, याचा निर्णय घ्या. निवडून देणाऱ्यांना शहेनशहा नको, तर सेवक बनवा, असे सांगत कोल्हापूरला हिंदुत्वाची कार्यशाळा बनवू नका,’ असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी आज येथे केले.
राजर्षी छत्रपती शाहूप्रेमी नागरिक विचार मंचतर्फे आयोजित ‘संविधान व लोकशाही’ व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते वानखेडे यांना चित्रमय शाहू चरित्र देण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यान झाले.
वानखेडे म्हणाले, ‘लोकशाहीत हुकूमशहा जन्माला यायला नको. मात्र, व्यक्तिपूजेतून हुकूमशहा जन्माला आला आहे. एक देश एक पक्षाचा घाट रचला जात आहे. मी कॉंग्रेसवर टीका केली, तेव्हा भाजपचा असल्याचा आरोप झाला. आता कॉंग्रेसी असल्याचा होत आहे. माझे कोणत्याच पक्षाशी वैर नाही. देशावर २०१४ ला ५४ लाख कोटी कर्ज होते. ते आता २०५ लाख कोटी रुपये झाले आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘आजच्या काळात बोलण्याची भीती आहे. त्यामुळे नोकरी करणारे माझे काही मित्र सत्ता पक्षाशी संबंधित असल्याने ते येथे येऊ शकले नाहीत. महागाई व बेरोजगारीने चिंतेत वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा मांडण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, आता जाहीरनामा सांगण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांची होत नाही.’ यावेळी चंद्रकांत यादव, तौफिक मुल्लाणी, अशोक पोवार, रमेश मोरे उपस्थित होते. अभिषेक मिठारी यांनी सूत्रसंचालन केले.
---

भाजपबरोबर जाताच देशप्रेमी
‘मुश्रीफांच्या घोटाळ्याची चर्चा होताच ईडीची कारवाई झाली. त्यांनी भाजपशी हात मिळवताच ते देशप्रेमी झाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते तीन दिवसांत उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपमध्ये चटई उचलणाऱ्यांची दया येते,’ असे वानखेडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com