संभाजी महाराज जयंती

संभाजी महाराज जयंती

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त
१४ पासून कार्यक्रमांचे आयोजन
मिरवणुकीत गोवन संस्कृतीतील शिमगोत्सव पथक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ ते १८ मे दरम्यान सांस्कृतिक, मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होत आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुजय मेंगाणे आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मिरवणुकीत गोवन संस्कृतीमधील ‘म्हाळशेचा गजर करायला येणारे शिमगोत्सव पथक’ विशेष आकर्षण असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मेंगाणे म्हणाले, ‘‘जरगनगर, रामानंदनगर व पाचगाव परिसरातील ३९ मंडळांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. संभाजी महाराज यांचा इतिहास युवा पिढीला कळावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर जुन्या पारंपरिक कलांना प्रोत्साहनही दिले जाणार आहे. फूड फेस्टिव्हलमध्ये पन्नासपेक्षा अधिक फूड स्टॉल्स असतील. या वेळी लकी ड्रॉ द्वारे उपस्थितांमधून प्रेक्षकांस एक सोन्याचे नाणे भेट दिले जाणार आहे. स्पॉट गेम्सचे आयोजन करून १० विजेत्यांना चांदीचे नाणे बक्षीस दिले जाणार आहे. हलगी सम्राट युवराज गायकवाड हलगी वादनाचे सादरीकरण करणार आहेत. म्हशींच्या शर्यतीत जनरल गट, बिगर नंबर गट व एक वर्षाआतील रेडकू अशा तीन गटांत स्पर्धा खेळण्यात येणार आहे.’’ यावेळी गौरव वडेर, अक्षय मगदूम, अर्जुन जरग, विनय लिंगडे, अर्थव पाटील, विकी कांबळे, अभिषेक पोवार उपस्थित होते.
---------------
कार्यक्रम असे
- मंगळवार (ता. १४) : जन्मकाळ सोहळा व लहान गटापासून ते खुल्या गटात चित्रकला स्पर्धा
- बुधवार (ता. १५) : भागातील महिला व युवतींसाठी होम मिनिस्टर व फूड फेस्टिव्हल
- गुरुवार (ता. १६) : ‘वाजवेल तो गाजवेल’ हलगी वादन स्पर्धा
- शुक्रवार (ता. १७) : म्हशीच्या शर्यती (जरगनगर कमान ते जरगनगर तिसरा बस स्टॉप)
- शनिवार (ता. १८) : पारंपरिक वाद्ये व लवाजम्यासह मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com