शहर कृती समिती

शहर कृती समिती

लोगो ः जिल्हा परिषद
-
फोटो 84054

दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना कृती समितीचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : नागरिकांच्या कामात दप्तर दिरंगाई करणाऱ्या ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यावर कारवाई करा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना आज दिले. मागणीची दखल न घेतल्यास घेराओ आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
या वेळी अशोक पोवार यांनी सहकार कोर्टाचा अवमान केल्याबद्दल करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, उचगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दत्तात्रय धनगर यांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी केली. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक नागरिकांची दैनंदिन कामे विनाकारण प्रलंबित ठेवून त्रास देत आहेत. याबाबत कोणी तक्रार केल्यास ते त्या कामात अडचणी निर्माण करून खोडा घालतात. उचगाव येथील ग्रामसेवक दत्तात्रय धनगर सहकार कोर्टातील आदेशानुसार एका सहकारी संस्थेचा हुकूमनामा नोंद करत नाहीत. ऑगस्ट २०२३ पासून ते नोंदीस टाळाटाळ करत आहेत. याबाबत जानेवारी २०२४ मध्ये करवीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनीही या कामात काही कारवाई केली नाही. ग्रामसेवक धनगर व करवीर गटविकास अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, असे त्यांनी स्पष्ट कले.
हातकणंगले पंचायत समिती कार्यक्षेत्रातील हेर्ले गावात माळभाग बिरोबा मंदिर शेजारी एका व्यक्तीने सरकारी रस्त्यावरच अतिक्रमण करून घर बांधले आहे. या प्रकरणी गेले सहा महिने ग्रामपंचायतीकडे तक्रार करत आहोत. त्याला प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रारही करण्यात आली. शिष्टमंडळात रमेश मोरे, शामराव जोशी, राजाभाऊ मालेकर, प्रकाश आमते, राजवर्धन यादव, प्रशांत चौगुले, शिवाजी पाटील, बाबा वाघापूरकर, दिलीप कांबळे, नीलेश देसाई, राजेश्वर साठे, फिरोज शेख, सदानंद सुर्वे, अजित चौगुले, विनोद डुणूंग, विलास मुळे, सदानंद सुर्वे, संजय पवार यांचा समावेश होता.

चौकट
कार्तिकेयन यांच्याकडून चौकशीचे आव्हान
उचगाव ग्रामसेवक, करवीर पंचायत समिती गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदमधील ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केल्यानंतर ग्रामसेवक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची चौकशी करण्याचे आश्‍वासन कार्तिकेयन यांनी दिल्याची माहिती रमेश मोरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com