महाराष्ट्राकडून पश्चिम बंगालचा सनसनाटी पराभव

महाराष्ट्राकडून पश्चिम बंगालचा सनसनाटी पराभव

85475
आनंदिता उपाध्याय
......
85476
नैनिका बेंद्रम
......
पार्थसारथी मुंढे
85477
..........
महाराष्ट्राकडून पश्चिम बंगालचा सनसनाटी पराभव

रमेश देसाई मेमोरियल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ः स्वानिकाची आकांक्षा घोषवर ६-१, ६-० सेटने मात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : एकोणिसाव्या रमेश देसाई मेमोरियल सोळा वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयने सातव्या मानांकित पश्चिम बंगालच्या आकांशा घोषवर सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने आकांक्षाला ६-१, ६-० सेटने पराभूत केले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे. डी. वाय. पाटील पुरस्कृत ही स्पर्धा केडीएलटीएच्या टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरू आहे.
मुलींच्या गटात चुरशीच्या लढतीत सहाव्या मानांकित हरियाणाच्या स्वस्ती सिंगने तेलंगणाच्या नवव्या मानांकित प्रिंसी मांडगल्लाचा टायब्रेकमध्ये ६-७ (४), ६-१, ६-१ सेटने पराभव केला. पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या नैनिका बेंद्रमने राज्य सहकारी देवश्री महाडेश्वरचे आव्हान ६-४, ६-३ ने संपुष्टात आणले. दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या श्रेया पठारेला ६-२, ६-१ ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या प्रतीक शेरॉनने महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदेला ६-४, ६-७, (३), ६-३ सेटने हरवले. महाराष्ट्राच्या नील केळकरने कडवी झुंज देत स्वराज ढमढेरेवर ६-३, ०-६, ७-६ (२) विजय मिळवला. महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीने कर्नाटकच्या शरण सोमसीला ५-७, ६-०, ६-२ ने पराभूत केले. महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेने क्वालिफायर वरद उंद्रेला ६-३, ६-१ ने नमविले.

मुले ः उप-उपांत्यपूर्व फेरी निकाल :
प्रतीक शेरॉन (हरियाणा) वि. वि. आराध्य म्हसदे (महाराष्ट्र) ६-४, ६-७ (३), ६-३.
नील केळकर (महाराष्ट्र ) वि. वि. स्वराज ढमढेरे (महाराष्ट्र) ६-३, ०-६, ७-६ (२).
हृतिक कटकम (तेलंगणा) वि. वि. संकल्प सहानी (पश्चिम बंगाल) ६-०, ६-१.
सक्षम भन्साळी (महाराष्ट्र) वि. वि. शरण सोमासी (कर्नाटक) ५-७, ६-०, ६-२.
तविश पाहवा (हरियाणा) वि. वि. चन्नामालिकाअर्जुन याले (कर्नाटक) ६-१, ६-१.
हर्ष मलिक (हरियाणा) वि. वि. निकित कोरीशेत्रू (कर्नाटक) ६-१, १-६, ७-६ (३).
प्रकाश सरण (कर्नाटक) वि. वि. विश्वजित सणस (महाराष्ट्र) ५-७, ६-४, ७-६ (२).
शिवतेज शिरफुले (महाराष्ट्र) वि. वि. वरद उंद्रे (महाराष्ट्र) ६-३, ६-१.

मुली : उप-उपांत्यपूर्व फेरी निकाल
दीपशिका विनयगमूर्ती (तमिळनाडू) वि. वि. रिद्धी शिंदे (महाराष्ट्र) ६-३, ४-६, ६-२.
स्वस्ती सिंग (हरियाना) वि. वि. प्रिंसी मांडगल्ला (तेलंगणा) ६-७ (४), ६-१, ६-१.
शैवी दलाल (गुजरात) वि. वि. दिशा कुमार (कर्नाटक) ६-३, ६-०.
नैनिका बेंद्रम (महाराष्ट्र) वि. वि. देवश्री महाडेश्वर (महाराष्ट्र) ६-४, ६-३.
पार्थसारथी मुंढे (महाराष्ट्र) वि. वि. श्रेया पठारे (महाराष्ट्र) ६-२, ६-१.
रांझना संग्राम (पंजाब) वि. वि. कीर्तना रंगिनेनी (तेलंगणा) ६-२, ६-१.
स्वानिका रॉय (महाराष्ट्र) वि. वि. आकांक्षा घोष (पश्चिम बंगाल) ६-१, ६-०.
आनंदिता उपाध्याय (हरियाणा) वि. वि. हर्षा ओरुगंती ६-०, ६-३.

दुहेरी गट : मुली - उपांत्यपूर्व फेरी
आनंदिता उपाध्याय (हरियाणा) व रांझना संग्राम (पंजाब) वि. वि. हिया कुगासिया (गुजरात) व दिशा कुमार (कर्नाटक) ६-०, ६-४.
स्वस्ती सिंग (हरियाणा) व एंजल पटेल(गुजरात) वि. वि. दीपशिका विनयगममूर्ती (तमिळनाडू) व रिया पुडियोक्काडा (कर्नाटक) ६-३, ६-२.
पार्थसारथी मुंढे (महाराष्ट्र) व आकांक्षा घोष (पश्चिम बंगाल) वि. वि. देवश्री महाडेश्वर (महाराष्ट्र) व सौम्या चॅटर्जी (पश्चिम बंगाल) ७-५, ६-१.
शैवी दलाल (गुजरात) व मेघना जीडी (कर्नाटक) वि. वि. अविपशा देहुरी (ओडिशा) व दिया अग्रवाल(महाराष्ट्र) ६-३, ६-४.

दुहेरी गट ः मुले - उपांत्यपूर्व फेरी
शरण सोमासी (कर्नाटक) व चन्नामालिकाअर्जुन याले (कर्नाटक) वि. वि. सार्थक गायकवाड (महाराष्ट्र) व सक्षम भन्साळी (महाराष्ट्र) ७-६ (३), २-६, १०-८.
मनन अगरवाल (महाराष्ट्र) व प्रकाश सरन (कर्नाटक) वि. वि. वीर मडम (गुजरात) व पर्जन्य अदुरी (तेलंगणा) ६-२, ६-३.
आराध्य म्हसदे (महाराष्ट्र) व ऋषी यादव (उत्तर प्रदेश) वि. वि. स्वराज ढमढेरे (महाराष्ट्र) व विश्वजीत सणस (महाराष्ट्र) ६-२, ६-१.
हृतिक कटकम (तेलंगणा) व तविश पाहवा (हरियाना) वि. वि. दिगंत एम (कर्नाटक) व फजल अली मीर (तामिळनाडू) ६-२, ६-४.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com