युवासेना मागणी

युवासेना मागणी

Published on

15176
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अकार्यक्षम, निर्णयक्षमता नसणाऱ्या अधिकाऱ्यांना कायमची सुटी द्या, या मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना देताना ठाकरे गटाच्या युवासेनेचे शिष्टमंडळ.

बनावट पदवीप्रकरणी दोषींवर कारवाई करा
युवासेनेचे कुलसचिवांना निवेदन; अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कायमची सुटी द्या

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : शिवाजी विद्यापीठातील अकार्यक्षम, निर्णयक्षमता नसणाऱ्या अधिकाऱ्यांना कायमची सुटी द्या, या मागणीचे निवेदन ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना आज देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक महिने विद्यापीठात पेपर फुटी, परीक्षा विभागातील गोंधळ, वसतिगृहाची दूरवस्था, क्रीडा विभागातील बनावट प्रमाणपत्रे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम असे विविध विषय ऐरणीवर आले आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाची बनावट पदवी चीनमध्ये वापरली आहे. यातून अनेक विभागाचे अधिकारी फक्त आयाराम-गयाराम पद्धतीने काम करत असल्याचे दिसत आहे. त्यातून विद्यापीठ बदनाम होत आहे. कुलगुरू व कुलसचिवांनी दोषींवर कारवाई करणे जरुरीचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. प्रत्येकाला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे तत्काळ कारवाई न केल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन केले जाईल. यावर डॉ. शिंदे यांनी लवकरच यावर चौकशी समिती नेमून गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख मंजित माने, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, अक्षय घाटगे, प्रथमेश देशिंगे, कीर्ती जाधव, अभिषेक दाबाडे, वैभव पाटील, ओंकार रनवरे यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.