सावंत म्हणणे

सावंत म्हणणे

Published on

मुनगंटीवार यांचे काय करायचे, हे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावे

इंद्रजित सावंत : वाघनखांबाबत चुकीची माहिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : वाघनखांबाबत चुकीची माहिती देणाऱ्या सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे काय करायचे, हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावे, अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिकमंत्री महाराष्ट्राला मिळाल्याची टीकाही त्यांनी केली.
श्री. सावंत म्हणाले, ‘‘मुनगंटीवार वाघनखांबाबतचे विधान सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटे बोलले आहेत. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. त्यांनी वाघनखांबाबत कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिली आहे. त्यांनी पुरावे नसतील तर नाहीत म्हणून सांगावे. जनतेची फसवणूक मात्र करू नये. संबंधित वाघनखं शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत, असे परिपत्रक सांस्कृतिक विभागाने काढले आहे. त्यासाठी झालेल्या खर्चाचे परिपत्रकही वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. कोल्हापूरमध्ये वाघनखं ठेवण्यासाठी सहा कोटी रुपयांच्‍या खर्चाची तरतूद केल्याचे परिपत्रक आहे. असे असताना वाघनखांसाठी फारसा खर्च झाला नाही, ही चुकीची माहिती आहे.’
ते म्हणाले, ‘चुकीची वस्तू लोकांसमोर आणून सरकारने लोकांची दिशाभूल करू नये. चुकीची माहिती देणाऱ्या मंत्र्याचं काय करायचं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावे. हे सरकार तोतया वाघनखं आणत आहे. मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षालाही माझे आवाहन आहे की, त्यांनी महाराष्ट्राची घोर फसवणूक होऊ देऊ नये.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.