कुरुंदवाडला आजपासून मयूर कृषी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडला आजपासून मयूर कृषी महोत्सव
कुरुंदवाडला आजपासून मयूर कृषी महोत्सव

कुरुंदवाडला आजपासून मयूर कृषी महोत्सव

sakal_logo
By

कुरुंदवाडला आजपासून मयूर कृषी महोत्सव
कुरुंदवाड, ता. ५ ः मयूर उद्योग समूह आणि डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एस. पी. हायस्कूलच्या प्रांगणात मयूर कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. उद्या (ता. ६) विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व नागपूरचे महाराजा मुधोजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचे उद्‍घाटन होणार असल्याची माहिती मयूर समूहाचे प्रमुख व भाजप पश्चिम महाराष्ट्र संयोजक डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, ‘‘६ ते १० जानेवारीअखेर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटक मकरंद देशपांडे, माजी मंत्री अजित घोरपडे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील, खासदार धनंजय महाडीक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे, कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.’’
युवा नेते अॅड. सुशांत पाटील म्हणाले, ‘‘शेती संस्कृती आणि मनोरंजन असे या महोत्सवाचे घोषवाक्य आहे. येथील शेतकऱ्‍यांना शेतीमधील नवतंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी कृषी महोत्सव आयोजित केला आहे. सुमारे तीनशे स्टॅाल असतील. तसेच तज्ज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.’