अर्बन बँक निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक निवड
अर्बन बँक निवड

अर्बन बँक निवड

sakal_logo
By

03182, 03183

फोटो ओळ
1) अध्यक्ष प्रदीप पाटील,
2) उपाध्यक्ष सुधाकर पाटील


....

कुरूंदवाड अर्बन बँकेच्या
अध्यक्षपदी प्रदीप पाटील

कुरुंदवाडः येथील स्वातंत्र्यसेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी प्रदीप बापूसाहेब पाटील, तर उपाध्यक्षपदी सुधाकर बाळासो पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी शिरोळचे सहायक निबंधक प्रेम राठोड होते. बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी प्रदीप पाटील यांचे नाव अरुण आलासे यांनी सुचविले. त्यास रेश्मा पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी सुधाकर पाटील यांचे नाव महादेव धनवडे यांनी सुचविले. त्यास दीपाली पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतिनाथ कनवाडे, ज्येष्ठ संचालक आण्णासो जोग, मोनाप्पा चौगुले, सुनील पाटील, महावीर थोटे, सुरेश उर्फ नंदकुमार पाटील, भगवान गायकवाड, इकबाल पटवेगार आदी उपस्थित होते.
.....