पोलिस डायरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस डायरी
पोलिस डायरी

पोलिस डायरी

sakal_logo
By

शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या
पैशांवरून शिरढोणमध्ये हाणामारी

कुरुंदवाड ता. १६ ः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून शिरढोण (ता. शिरोळ) येथे हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर भूपाल माणगावे, महावीर भूपाल माणगावे, बाहुबली रावसाहेब मालगावे (सर्व रा. शिरढोण ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शिरढोण येथील बाहुबली मालगावे व महावीर माणगावे एकाच गल्लीत राहतात. महावीर माणगावे यांनी वेफा कंपनीत बाहुबली मालगावे यांच्या सांगण्यावरून एक वर्षांपूर्वी ५२ लाखांची गुंतवणूक केली आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास महावीर माणगावे यांनी बाहुबली मालगावे यांच्याकडे गुंतवणूक केलेले पैसे मागितले असता दोघांत वादावादी झाली. वादावादीचे हाणामारीत रूपांतर झाले. महावीर माणगावे आणि सागर मालगावे या दोघांनी बाहुबली मालगावे याला शिवीगाळ करत लोखंडी रॉड, काठीने मारहाण करून जखमी केल्याचे बाहुबली मालगावे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर बाहुबली मालगावे यांच्याकडे महावीर माणगावे याने गुंतवणूक केलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून मालगावे याने शिवीगाळ करत गाडीच्या किल्लीच्या कटरने माणगावे याच्यावर वार करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण नागरगोजे करीत आहेत.