आढावा बैठक कुरुंदवाड पालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आढावा बैठक कुरुंदवाड पालिका
आढावा बैठक कुरुंदवाड पालिका

आढावा बैठक कुरुंदवाड पालिका

sakal_logo
By

03221
कुरुंदवाड ः येथे पालिका सभागृहात आढावा बैठकीत बोलताना खासदार धैर्यशील माने. यावेळी उपस्थित मुख्याधिकारी चौहान व मान्यवर.

रखडलेली सुधारित नळपाणी
योजना कार्यान्वित करणार

खासदार माने; कुरुंदवाड पालिकेत आढावा बैठक

कुरुंदवाड ता. २१ ः शहराच्या रखडलेल्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेबाबत जुन्या ठेकेदाराला जिल्हाधिकाऱ्यांसमोर बोलवून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सोबत घेऊन बैठक घेऊन योजना कार्यान्वित करणार आहे. योजनेसाठी वाढीव दहा कोटींचा निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी केली.
येथे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्याधिकारी तथा प्रशासक आशीष चौहान, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, विजय पाटील, जवाहर पाटील उपस्थित होते.
माने म्हणाले, ‘शहरातील चतुर्थ वार्षिक कर आकारणीसंदर्भात नगरविकासमंत्री, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढू. पंचगंगा प्रदूषण प्रश्नावरून व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटुकले यांनी राधानगरी धरणातून पाणी सोडून नदी प्रवाहित करावी; अशी मागणी केली. खासदार माने यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नदी प्रवाहित करण्याबाबत चर्चा केली. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले.
प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी सीसीटीव्ही, भाजीपाला शॉपिंग सेंटर, सांस्कृतिक हॉल उभारणे, भैरववाडी ते शिवतीर्थपर्यंत अनवडी बायपास रस्त्यासह विकासकामांचा ४० कोटींचा प्रारूप विकास आराखडा सादर केला. प्रस्ताव तयार करून निधीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
खासदार माने यांच्या फंडातून नाना नानी पार्क व उद्यानात लहान मुलांना व वृद्धांना व्यायामासाठी बसविलेल्या साहित्याची माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातही साहित्य देण्याची घोषणा खासदार माने यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अक्षय आलासे, दीपक गायकवाड, उदय डांगे, प्रफुल्ल पाटील, रविकिरण गायकवाड, सचिन मोहिते आदींनी विविध समस्यांची माहिती समोर ठेवली.
जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे, कृष्णा नरके, अली पठाण, रामभाऊ मोहिते, नायकू दळवी, बाळासाहेब ठोंबरे, विलास पाटील, जितेंद्र साळुंखे, प्रवीण खबाले उपस्थित होते.