कुरुंदवाडच्या चतुर्थ वार्षिक करप्रश्‍नी शिष्ठमंडळ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुंदवाडच्या चतुर्थ वार्षिक करप्रश्‍नी
शिष्ठमंडळ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना
कुरुंदवाडच्या चतुर्थ वार्षिक करप्रश्‍नी शिष्ठमंडळ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना

कुरुंदवाडच्या चतुर्थ वार्षिक करप्रश्‍नी शिष्ठमंडळ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना

sakal_logo
By

कुरुंदवाडच्या चतुर्थ वार्षिक करप्रश्‍नी
शिष्टमंडळ भेटले जिल्हाधिकाऱ्यांना
आठ दिवसांत निर्णय न झाल्यास शहर बंद
कुरुंदवाड, ता. १४ : महापूर व कोरोनामुळे शहराची अर्थव्यवस्था कोलमडली असून, नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. अशा स्थितीत शहराची चतुर्थ वार्षिक कर आकारणी रद्द होण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह सर्वपक्षीय शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेत मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, करमाफीचा निर्णय आठ दिवसांत न झाल्यास बेमुदत कुरुंदवाड शहर बंद पुकारून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीतर्फे देण्यात आला.
माजी शहरप्रमुख राजू आवळे म्हणाले, ‘‘शहरात १३०० यंत्रमाग व्यावसायिक होते. आपत्तीने हा व्यवसाय मोडकळीस येऊन केवळ ३०० व्यावसायिक राहिले आहेत. करवाढ करत असताना याचा विचार होणे गरजेचे आहे.’’ कृती समिती अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे म्हणाले, ‘‘सुनावणीच्या दिवशी नगररचना अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीयांची सायंकाळी बैठक घेऊन निर्णय घेणार असे आश्‍वासन दिले होते, मात्र आम्हाला न बोलवता एकतर्फी निर्णय घेतला.’’
या वेळी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, आप्पासाहेब भोसले, सुरेश बिंदगे, रियाज शेख, बबलू पवार आदी उपस्थित होते.