
मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करा
03314
कुरुंदवाड ः सैनिकी पॅटर्न शाळेतील पारितोषिक वितरण समारंभात सौ. वैशाली आवाडे यांनी मार्गदर्शन केले
----------
मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करा
वैशाली आवाडे; करुंदवाडला सैनिकी शाळेचे पारितोषिक वितरण
कुरुंदवाड, ता. २६ ः सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत राष्ट्राची भावी पिढी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून उत्तमरितीने होत असून संस्थेने मुलींसाठीही सैनिकी पॅटर्न निवासी शाळा सुरु करावी. यासाठी या संस्थेस सर्वतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र अर्बन को - ऑप. बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली स्वप्नील आवाडे यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या वार्षिक संचलन, मानवंदना व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आवाडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे होते. डॉ. कांबळे म्हणाले, ‘उत्कृष्ट शरीर संपदा ही प्रत्येक व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे. या प्रशालेतील शिक्षक त्यागी व समर्पित भावनेने योगदान देत आहे. यामुळे अल्पावधीतच या शाळेने नावलौकिक प्राप्त केला असून ही शाळा या परिसराचे भूषण बनली आहे.’
शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या बालसैनिकांनी उत्कृष्ट संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी मल्लखांब, लेझीम, झांज पथक, योगा, कराटे यांची बहारदार प्रात्यक्षिके सादर केली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मनिषा कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सतीश माने यांनी करून दिला. सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, दिपक निंगुडगेकर, संस्थेच्या सचिव सौ. सीमा जमदग्नी, संचालक राहुल पागे, हेमंत पराडकर, सतीश कुलकर्णी, सुहास जमदग्नी यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रमोद शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. वहिदा पठाण व प्रमोद शिंदे यांनी केले.