Tue, March 28, 2023

यिन अध्यक्ष पटेलने फडकावला तुर्कीमधील परिषदेत तिरंगा
यिन अध्यक्ष पटेलने फडकावला तुर्कीमधील परिषदेत तिरंगा
Published on : 8 March 2023, 12:15 pm
03321
तुर्की ः येथील परिषदेत अमन पटेल यांनी पारंपरिक कोल्हापुरी वेषभूषेत तिरंगा फडकावला.
------
यिन अध्यक्ष पटेलने फडकावला
तुर्कीमधील परिषदेत तिरंगा
कुरुंदवाड, ता. ८ ः येथील एस. के. पाटील महाविद्यालयातील सकाळ ‘यिन’ अध्यक्ष अमन फैय्याज पटेल (रा. कनवाड, ता. शिरोळ) याने तुर्कीत झालेल्या युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्समध्ये कोल्हापुरी वेशभूषेत भारतीय तिरंगा फडकावत ८० देशांतील प्रतिनिधींचे लक्ष वेधले. शस्त्र या विषयावर देशाची भूमिका मांडली.
भारतातून सहा विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पटेल यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. श्री. पटेल यांची यापूर्वी विविध परिषदांसाठी निवड झाली आहे. खेल मंत्रालयामार्फत घेतलेल्या युवा संसदेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. नॅशनल सोशल यूथ आयकॉन गोल्डन ॲवॉर्डचा मानकरी आहे.