औद्योगिक वसाहतीस जागा देण्यास विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक वसाहतीस जागा देण्यास विरोध
औद्योगिक वसाहतीस जागा देण्यास विरोध

औद्योगिक वसाहतीस जागा देण्यास विरोध

sakal_logo
By

औद्योगिक वसाहतीस जागा देण्यास विरोध
सैनिक टाकळीत गावसभा; शिष्टमंडळाने घेतली आमदार यड्रावकर, जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कुरुंदवाड, ता. १२ ः अकिवाट व सैनिक टाकळी येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीस सैनिक टाकळी येथील गायरान जमीन संपादित करण्यास विशेष गावसभेत विरोध केला. महाराष्ट्र शासनातर्फे अकिवाट व सैनिक टाकळी येथील गायरान जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत शासकीय व प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर सैनिक टाकळी गावाने प्रस्तावित औद्योगिक वसाहतीस त्यांच्या हद्दीतील जागा देण्याबाबत विशेष गावसभा बोलविली होती. त्यामध्ये जागा देण्यास गावाचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अध्यक्षस्थानी सरपंच हर्षदा पाटील होत्या. याचप्रश्नी गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन व ठरावाच्या प्रती दिल्या आहेत. दरम्यान, गावसभेनंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व आमदार यड्रावकर यांची भेट घेत गायरान जमीन संपादित करण्यास विरोध असल्याचे सांगत दोन्ही गट वगळण्याची मागणी केली. शिष्टमंडळात श्रीधर भोसले, गणेश पाटील, विनोद पाटील, ज्ञानदेव पाटील, दीपक पाटील, उदय पाटील, शरद पाटील, संजय पाटील, संताजी पाटील, संतोष गायकवाड, वाल्मिक कोळी यांचा समावेश होता.