गुर्‍हाळघराकडे जाणारा ऊस रोखून धरला

गुर्‍हाळघराकडे जाणारा ऊस रोखून धरला

कुरुंदवाडमध्ये गुऱ्हाळाकडे जाणारा ऊस रोखला

कुरुंदवाडः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या येथील कार्यकर्त्यांनी काडापूर (ता.चिकोडी) येथून नांदणी येथील गुऱ्हाळाकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर रोखून धरला. गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत व यंदाच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, ट्रॅक्टरमध्ये २० ते २५ टन ऊस भरलेला होता. ट्रॅक्टर अडवून धरला तर शेतकऱ्या‍चेच नुकसान होणार असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर चालकाला ७ तारखेच्या ऊस परिषदेत निर्णय झाल्याशिवाय परत ऊस तोड करू नका, असे सांगून ट्रॅक्टर सोडून दिला. यावेळी संघटनेचे अविनाश गुदले, वर्धमान भबीरे, अमोल चौगुले, सुरेश भबीरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com