शेतकरी आत्महत्या प्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल.

शेतकरी आत्महत्या प्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल.

शिरोळ तालुक्यातील
पाच सावकारांवर गुन्हा
शेतकरी आत्महत्या ः एक जण ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. १४ ः खासगी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या शेडशाळ (ता. शिरोळ) येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय ४४) यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच सावकारांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद श्रीमती रेखा भालचंद्र तकडे (वय ३९) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली हाोती. रविकांत धनपाल जगताप, चंद्रकांत धनपाल जगताप (दोघे रा. कवठेगुलंद ता. शिरोळ), बाबू आप्पासो नाईक, विजय पापा नाईक, महादेव गणू नाईक (तिघे रा. शेडशाळ, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकारांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
भालचंद्र तकडे याने साोमवारी (ता. १३) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत तकडे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून, त्यात पाच सावकारांची नावे लिहून यांनी मला जिवंत मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून मी आत्महत्या करून घेत आहे. मी त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे तकडे याने स्पष्टपणे लिहले होते.
दरम्यान, मृत तकडे यांच्या पत्नी श्रीमती रेखा यांनी आज पतीच्या आत्महत्येप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली असून रविकांत जगताप, चंद्रकांत जगताप, बाबू नाईक, विजय नाईक, महादेव नाईक यांनी व्याजाने रक्कम दिली होती. ती रक्कम मागणीसाठी तगादा लावून दोघा पती-पत्नीकडून जबरदस्तीने नोटरी करून घेऊन भालचंद्र तकडे याला समक्ष भेटून आणि फोनवरून धमकी देऊन मानसिक त्रास दिला होता. त्य‍ांच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच पतीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com