जुगार अड्डा छापा

जुगार अड्डा छापा

जुगार अड्ड्यावर
दत्तवाडमध्ये छापा

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) गावच्या हद्दीतील एका हॉटेलच्या दोन खोल्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २१ हजार ६०० रुपये रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, उदय पाटील (रा. दत्तवाड), रवींद्र काकासाहेब पाटील (रा. दत्तवाड), प्रशांत अण्णासाहेब पाटील (रा. कवठेगुलंद), सुनली कुमार मगदूम (रा. दत्तवाड), ओंकार भीमराव यादव (रा. चंदूर), सौरभ सुनील पवार (चंदूर) हे जुगार खेळत होते. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १७,१०० रुपये रोख रकमेसह एक लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com