आंदोलन बातमी

आंदोलन बातमी

छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या
ाकामासाठी कुरुंदवाडला उपोषण

कुरुंदवाड ता. ६ : येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामाला तत्काळ सुरुवात करावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीने आज पालिका चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरण व अन्य कामासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध आहे. जानेवारीत त्या निधीतील कामाची पायाभरणी झाली असून काम मात्र बंद आहे. शिवतीर्थ परिसर बंदिस्त केला आहे. काम सुरू करण्याबाबत वेळोवेळी पालिकेकडे निवेदने दिली. मात्र प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याने बलिदान मास समितीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. मुख्याधिकारी आशिष चौहान, अभियंता प्रदीप बोरगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिवतीर्थ परिसर व्यापक आणि मोठा करण्याचा दृष्टिकोनातून लगतची जमीन हस्तांतर आणि हेरिटेजकडे विहीर मागणी केली. त्यांनी सकारात्मकता दाखवली नाही. विहिरीची भिंत दुरुस्त करावी लागणार आहे. २ कोटींचा निधी आवश्यक आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि विविध योजनेतून निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेणार आहे. त्यावेळी प्रतिनिधीही पाठवावा आणि आंदोलन स्थगित करावे, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलनात अमृत चोपडे, गौतम पाटील, नितीश आंबी, रोहन बिंदगे, अभिषेक पारनाईक, सोमेश गवळी, रघु नाईक, मंदार पटूकले, संदीप डोंगरे, बबलू पवार, भीमराव पाटील, सुरेश बिंदगे, बाबासाहेब सावगावे, प्रफुल पाटील, अभय पाटुकले यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com