तरुणांनी शिवचरित्र अभ्यासावे : गणेश शिंदे

तरुणांनी शिवचरित्र अभ्यासावे : गणेश शिंदे

83035

तरुणांनी शिवचरित्रातून दूरदृष्टी शिकावी
गणेश शिंदे ः कसबा बावड्यात व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा, ता. ११ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून तरुणांनी स्वाभिमान, धाडस, नावीन्य, दूरदृष्टी शिकावी. सध्याच्या तरुणांना ढाल-तलवारी घेऊन लढायला जायचं नाही. तर व्यवसाय उद्योगात स्वतःला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या तरुणांनी बदल स्वीकारून सामर्थ्य वाढवण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवव्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. कसबा बावडा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
''छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण'' विषयावर बोलताना शिंदे यांनी शिवरायांचे इतिहासातील धाडसी प्रसंग सांगितले. शिवराय हे उत्तम प्रशासक होते. त्यांनी मावळ्यांची ताकद ओळखली होती. तशी प्रत्येक तरुणाने स्वतःची सक्षम बाजू ओळखाव्‍यात. नावीन्य शोधावे, संशोधन प्रवृत्ती वाढवावी आणि या सगळ्यांसोबत सामाजिक एकोपाही जपावा. शिवचरित्रातून प्रसंगावधान, स्वाभिमान, लढाईचे सामर्थ्य, शौर्य, गनिमीकावा अभ्यासावा. आपला व्यवसाय, व्यापार, उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत अणि मोठी स्वप्ने पाहावी.’
शिंदे म्हणाले, ‘प्रक्रियेत पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे असते. केवळ मुलांच्या शिक्षणाची फी भरणे पालकांचे कर्तव्य नाही. पालकांनी लेकरांचे सुप्तगुण ओळखावेत. गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही हे गांभीर्याने लक्षात घ्यावे. मुलांसाठी मोठी स्वप्न पाहणे ही पालकांची आद्य जबाबदारी आहे.’ आपल्याकडे जे काही आहे, ते खणखणीत वाजवता यायला हवं. कधी नैराश्य आले तर शिवरायांच्या इतिहासाचा एखादे प्रकरण वाचा, तुम्हाला पुढची दिशा मिळेल, असा संदेशही शिंदे यांनी दिला. यावेळी मोहन सालपे, रोहन मोहिते, किरण शिंदे, पवन निकम, दीपक केर्लेकर, जीवन कडोलकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, महिलावर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com