वृक्षप्रेमी संस्थेकडून वृक्षारोपण

वृक्षप्रेमी संस्थेकडून वृक्षारोपण

01004
कसबा बावडा : वृक्षप्रेमी संस्थेकडून येथील गोळीबार मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

बावड्यातील गोळीबार मैदानावर
वृक्षप्रेमी संस्थेकडून वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
कसबा बावडा, ता. ३ : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बावड्यातील गोळीबार मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षप्रेमी संस्थेतर्फे १० ते १२ फुटी देशी आणि कलमी फळझाडे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, केशर कलम आंबा, जांभूळ, पेरू, महोगणी, कांचन, कडुलिंब, नीलमोहर, बुच, जरूर अशा प्रजातींचा समावेश होता.
वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी दर रविवारी वृक्ष लागवड, वृक्षांचे संवर्धन जतन केले जाते. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी संस्थेचे सदस्य स्वबचतीतून वर्गणी संकलित करतात. गेल्या आठ वर्षांपासून संस्थेकडून असे उपक्रम राबवले जातात. या संस्थेसोबत समाज माध्यमांतील आवाहनातून पावणे दोनशे सदस्य जोडले गेले आहेत. वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये राज्य कर जीएसटी विभागाचे उपायुक्त शर्मिला मिस्किन, तेजस्विनी मोरे, महादेव लवटे, श्रीराम बजबळे, स्वाती पाटील, पोलिस दल फॉरेन्सिक लॅबचे संचालक अश्‍विन गेडाम, वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढ्ढे, राजेंद्र शिंदे, सविता पाटील, लीना यादव, सविता साळोखे, मनीषा शिरोलीकर, अमित कारंडे, सचिन पोवार, महादेव मोरे, प्रवीण मगदूम, अमर संकपाळ, स्मिता दिवसे, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, भैय्या देशमुख, रवी ताटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com