राज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम

राज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम

01014
कसबा बावड्यात वृक्षारोपण
कसबा बावडा : हनुमान तळे येथील चौपाटी म्हणजेच आंबेडकर उद्यानात येणारे ज्येष्ठ, कनिष्ठ आणि महिला यांच्यातर्फे शिवराज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण तसेच वृक्षसंवर्धन दिनाचा संगम साधून वृक्षारोपण उपक्रम राबविला. नागरिकांनी एकत्रित फुलांचे तसेच देशी झाडांचे वृक्षारोपण केले. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची हमी घेतली. नागरिक तसेच फिरायला येणाऱ्यांकडून २ ते ४ जूनपासून बागेची स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यापाठोपाठ आज वृक्षरोपणाचा उपक्रम झाला. यावेळी गुड मॉर्निंगचे मेंबर्स संजय पाटील, संदीप पाटील, नामदेव पाटील, संजय देसाई, अभिजीत खाडे, अरविंद खाडे, अमर भोसले सराफ, दीपक पवार, गणेश भोसले, सचिन सुतार, दिलीप सुतार, शंकर कांबळे, सुभाष गदगडे, किशोर पळसुळेकर, अंजना पाटील, हणमंत पाटील, अरुण कांबळे, कुंभार सर, संभाजी जाधव, राहुल देसाई आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com