वाचन संस्कृती रुजवणारी शाळा

वाचन संस्कृती रुजवणारी शाळा

Published on

01060
प्रिन्स शिवाजी विद्यालयात
वाचनसंस्कृती वाढीसाठी उपक्रम
कसबा बावडा ः विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, वाढावी म्हणून बावड्यातील प्रिन्स शिवाजी विद्यालयात अनोखा उपक्रम राबवला जात आहे. एक वर्षापासून शाळेला एका खासगी संस्थेने (डी मार्ट फाउंडेशन) सीएसआर फंडातून एक हजार पुस्तके दिली आहेत. त्यामुळे ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास मदत होत आहे. महापालिकेच्या पाच शाळांत हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पटसंख्येच्या निकषांवर विद्यालयाची शाळेची निवड केली. शाळेत आद्ययावत शिक्षक, डिजिटल वर्ग, संगणक कक्ष, सुसज्ज वाचनालय आहे. वाचनालयात पहिली ते सातवीच्या वर्गासाठी आवश्यक असणारी विविध पुस्तके आहेत. सेमी मराठी वर्गतील २१० विद्यार्थी लाभ घेतात. वर्गानुसार, कल पाहून पुस्तके दिली जातात. पुस्तके कशी वाचायची इथंपासून ते पुस्तक वाचण्याचे नियमांपर्यंत सर्व काही शिकवले जाते. प्रत्येक वर्गाला दिवस ठरवून दिला आहे. विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वाचनालयात यायचे. आवडते पुस्तक घ्यायचे आणि आठवडाभर पुस्तक वाचून परत करायचे; असे उपक्रमाचे स्परूप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.