''जेनेसिस'' मध्ये ९ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''जेनेसिस'' मध्ये ९ फेब्रुवारी रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन
''जेनेसिस'' मध्ये ९ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

''जेनेसिस'' मध्ये ९ फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

जेनेसिस कॉलेजमध्ये ९ ला रोजगार मेळावा
कसबा तारळे : गैबी-राधानगरीतील जेनेसिस कॉलेजमध्ये ९ फेब्रुवारीला आमदार प्रकाश आबिटकर व गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या संकल्पनेतून १४०० रिक्त जागांसाठी रोजगार मेळावा होणार असल्याची माहिती प्राचार्य शोभराज माळवी यांनी दिली. ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते पदव्युत्तर तसेच आयटीआय, डिप्लोमा व डिग्री इंजिनिअर्स, फार्मसी, डीएमएलटी असे शिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवकांना रोजगार मेळावा संधी असून मेळाव्यात नामांकित उद्योग व कंपन्या सहभागी होतील. शिकाऊ उमेदवारीसाठीही नोंदणी करता येईल. स्वयंरोजगाराबाबतही तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अर्थसहाय्याबाबतची माहिती आणि स्टार्टअपसाठीही मार्गदर्शन मिळेल.’ गरजूंना प्रवेश मोफत असून नावनोंदणी दयानंद सावर्डेकर व महेंद्र रासम यांच्याकडे करावी,असे आवाहन कॉलेजने केले आहे.