शिमगोत्सवाच्या जोडीने श्री विठ्ठलाई यात्रोत्सवास प्रारंभ : कसबा तारळेत गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिमगोत्सवाच्या जोडीने श्री विठ्ठलाई यात्रोत्सवास प्रारंभ : कसबा तारळेत गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना सुरुवात
शिमगोत्सवाच्या जोडीने श्री विठ्ठलाई यात्रोत्सवास प्रारंभ : कसबा तारळेत गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना सुरुवात

शिमगोत्सवाच्या जोडीने श्री विठ्ठलाई यात्रोत्सवास प्रारंभ : कसबा तारळेत गाऱ्हाण्याच्या फेऱ्यांना सुरुवात

sakal_logo
By

कसबा तारळे, दुर्गमानवाडच्या
विठ्ठलाईदेवीचा यात्रोत्सव सुरू
कसबा तारळे, ता. ७ : दोन दिवसांच्या शिमगोत्सवाच्या जोडीने कसबा तारळे व दुर्गमानवाड येथील देवी श्री विठ्ठलाईच्या पंधरा दिवसांच्या यात्रोत्सवास होळी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला असून गुढीपाडव्याच्या आधी अमावस्येला यात्रोत्सवाची सांगता होईल.
पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकण व कर्नाटक सीमा भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली दुर्गमानवाड व कसबा तारळे येथील देवी श्री विठ्ठलाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान मानले जाते. या देवीची जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये ख्याती आहे. गुढीपाडव्याच्या आधी दोन दिवस कसबा तारळे व त्याआधी एक दिवस दुर्गमनवाड येथील अशी दोन दिवस मुख्ययात्रा असते. यात्रोत्सवाची होळी पौर्णिमेपासून सुरुवात झाली. सोमवारी रात्री ग्रामदैवत मारुती मंदिरासमोरील चौकात पारंपरिक पद्धतीने गावहोळी उभारून बाजूला मानकरी पाटील यांच्या हस्ते होळी प्रदीपन झाले. त्यानंतर प्रमुख देवदेवतांसमोर होळी प्रदीपन केले. गतवर्षी यात्रोत्सवाच्या सांगतेवेळी गाव सुखी राहण्याच्या उद्देशाने घातलेला सुरक्षेचा तिढा सोडवण्याची प्रथा म्हणून श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाच्या (यात्रा उत्सव पारंपरिक समिती) वतीने गाऱ्हाण्याचा उलटा फेरा काढला. देवी श्री विठ्ठलाई मंदिरासमोर मुजावर बंधूंनी फात्या (गाव सुखी राहण्याबाबतची प्रार्थना) फोडल्यानंतर चंद्रकांत प्रभू यांनी ''देवीचा पंधरा दिवसांचा यात्रोत्सव उत्साहात पार पडू दे व गावकऱ्यांकडून देवीची सेवा घडू दे'' असे गाऱ्हाणे घातले. आज रात्रीपासून मानाचे पोतदार घराणे ते देवी श्री विठ्ठलाई मंदिर व तेथून पुढे मारुती मंदिर ते पुन्हा पोतदार घराणे मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या तालात गाऱ्हाण्याचा फेरा निघाला आणि यात्रोत्सवाला सुरुवात झाली.