
कसबा तारळे विठलाई मंदिराला क वर्ग यात्रास्थळ दर्जा
जिल्हा परिषदेकडून तारळेच्या विठ्ठलाई
मंदिराला क वर्ग यात्रा स्थळ दर्जा
कसबा तारळे : येथील देवी श्री विठ्ठलाई मंदिराला आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेने क वर्ग यात्रा स्थळ म्हणून दर्जा दिला असून तसे पत्र जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अरुण जाधव यांनी येथील ग्रामपंचायतीस नुकतेच दिले. येथील देवी श्री विठ्ठलाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान असून दरवर्षी येथे भरणाऱ्या देवीच्या यात्रेस पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भाग व कोकण, मुंबई आदी ठिकाणांहून हजारो भाविक हजेरी लावतात. सध्या देवी श्री विठ्ठलाईचा पंधरा दिवसांचा यात्रोत्सव सुरू असून नेमक्या याच कालावधीत हे पत्र मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाच्या वतीने यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आमदार आबिटकर तसेच ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी फटाके वाजवून व साखर- पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
...
2141
नेसरी : जलजीवन मिशन योजनेचा प्रारंभ करताना सरपंच गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर. शेजारी संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व अन्य मान्यवर.
...
नेसरीत जलजीवन मिशन योजनेचा प्रारंभ
नेसरी : येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सुधारणा करण्यासाठी २ कोटी ४ लाख ५० हजार रूपये निधी मंजूर झाला असून याचा प्रारंभ सरपंच गिरिजादेवी शिंदे-नेसरीकर यांच्या हस्ते झाला. तसेच जुनी पाण्याची टाकी येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारणा कामाचा प्रारंभही करण्यात आला. यावेळी महिलांनी आणलेल्या कलशाचे पूजन पुरोहित सतीश जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी नेसरी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष यशोधन शिंदे-नेसरीकर, संयोगिता शिंदे-नेसरीकर, उपसरपंच प्रथमेश दळवी, माजी सरपंच वसंत पाटील, प्रकाश दळवी, परसु नाईक, चंद्रकांत शिंदे, एम. एस. तेली, मजीद वाटंगी, गोपाळ पाटील, संजय नाईक, अमर कोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ठेकेदार सदानंद पाटील यांनी नळ पाणी पुरवठा सुधारणा कामाची माहिती दिली.
...
शाहूवाडी तहसीलवर मंगळवारी ‘स्वाभिमानी’ चा मोर्चा
सरुडः जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईपोटी २० लाख रुपये मिळावेत. शेती उपसा पंपाला दिवसा वीजपुरवठा करावा या व अन्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता.२१) शाहूवाडी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे, माजी खासदार राजू शेट्टी हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. जखमी शेतकऱ्यांवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात यावेत. महावितरण कंपनीकडून प्रस्तावित ३७ टक्के वीजदर वाढ रद्द करावी, वास्तव मीटर रिडींग घेऊन कृषी पंपांची वीजबिल आकारणी करावी, शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत करू नये, पंपांचे प्रलंबित वीज कनेक्शन तातडीने द्यावे, आदी विविध मागण्यांबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी २१ मार्च रोजीच्या मोर्चात शाहूवाडीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.