चंद्रे येथे शहीद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रे येथे शहीद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न
चंद्रे येथे शहीद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

चंद्रे येथे शहीद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

sakal_logo
By

तिटवेत लक्ष्मी महाविद्यालयाचे शिबिर
कसबा वाळवे : तिटवेतील वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) हिवाळी शिबिर चंद्रे (ता. राधानगरी) येथे २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत झाले. कॅम्पमध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील कॉलेजतर्फे रक्तदान शिबिर तर वालावलकर हॉस्पिटलमार्फत डोळे व आरोग्य तपासणी झाली. दोन्ही शिबिरांना चंद्रे आणि परिसरातील ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय होता. शिबिरात ऑनलाईन व्यवहार जनजागृती, रक्तदान-देहदान श्रेष्ठ दान, महामानव व सद्यःस्थिती, समाजकार्यात स्त्रियांचे महत्त्व, महिला बचतगट सक्षमीकरण, युवतींचा ध्यास-समाज विकास विषयांवर व्याख्याने झाली. प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पूजा चितूरकर, प्रा. वैभव कुंभार, संतोष फराकटे समन्वयक होते. चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच विलास पाटील, शिवाजी मेंगाणे सहभागी होते. शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.