कोतोलीच्या हौसाबाईंनी पतीच्या स्मरणार्थ जोपासले वृक्षप्रेम

कोतोलीच्या हौसाबाईंनी पतीच्या स्मरणार्थ जोपासले वृक्षप्रेम

पतीच्या स्मरणार्थ जोपासले वृक्षप्रेम
कोतोली ः येथील हौसाबाई मेंगाणे पती माजी सैनिक दौलतराव मेंगाणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवितात. यावर्षी त्यांनी पतीच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अकरा झाडे लावली. दौलतराव ज्ञानदेव मेंगाणे यांनी सैन्यदलात वीस वर्षे सेवा केली. मेंगाणे यांनी १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध, तर १९६५ व १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला. निवृत्तीनंतर पन्हाळा तालुका माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी माजी सैनिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. यावर्षी पतीच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त वेगवेगळी अकरा झाडे लावली. यावेळी मुलगा श्रीहरी मेंगाणे, अश्विनी मेंगाणे, महादेव पाटील, सुभाष लव्हटे, संदीप चौगुले, संतोष पोवार, शामराव पाटील, संभाजी सुतार, राजेंद्र लव्हटे उपस्थित होते. हौसाबाई मेंगाणे म्हणाल्या, ‘निसर्गाचा समतोल राहण्यासाठी वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे. निसर्गाचा समतोल वृक्षतोडीमुळे बिघडला आहे. हे ओळखून हा उपक्रम राबविला.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com