पन्हाळा तालुक्यातील १५ शाळांना ३०० पुस्तके भेट

पन्हाळा तालुक्यातील १५ शाळांना ३०० पुस्तके भेट

Published on

00290
पन्हाळा तालुक्यातील
१५ शाळांना ३०० पुस्तके

कोतोली : कोतोली (ता. पन्हाळा) येथील नेहरू विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज मध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवनराव साळोखे यांच्याकडुन पन्हाळा तालुक्यातील १५ शाळांना ३०० पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एस. पोर्लेकर होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य जीवनराव साळोखे म्हणाले की, ‘सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनसंस्कृती लोप पावत आहे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी शाळेपासूनच सुरुवात झाली पाहिजे. यासाठी शाळेतील ग्रंथालय समृद्ध असावे. ग्रंथालय शाळेचा आत्मा आहे. प्रत्येकाने सुसंस्कारित होण्यासाठी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. एकमेकांना पुस्तके भेट देऊन नियमित वाचन करावे. डी. एस. लव्हटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक संघांचे संचालक श्रीकांत पाटील, अजित रणदिवे, पी. एस. पाटील, तेजस्विनी पाटील, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. एच. वाय. शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.