भाचरवाडी येथील खचलेल्या रस्त्याचे काम चालू

भाचरवाडी येथील खचलेल्या रस्त्याचे काम चालू

00597
भाचरवाडी : येथील खचलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले. (छायाचित्र : संग्राम पाटील, तिरपण)

खचलेल्या रस्त्याचे
भाचरवाडीत काम सुरू
१५ दिवसांत काम पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
कोतोली, ता. १४ : भाचरवाडी ते खडेखोळ (ता. पन्हाळा) दरम्यानच्या मुख्य मार्गावरील रस्ता गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीने खचला होता. यावर्षी पावसाळा जवळ आला तरी खचलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते. याबाबत ‘दैनिक सकाळ’मधून बुधवारी (ता. ८) ‘भाचरवाडी रस्त्याची अवस्था जैसे थे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत खचलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पन्हाळा पश्‍चिम भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जवळचा मार्ग म्हणजे भाचरवाडी ते खडेखोळ रस्ता होय. हा रस्ता झाल्यापासून या रस्त्यावर वाहतूक वाढली होती. मात्र, गेल्या वर्षी पावसाळ्यात एका ठिकाणी हा रस्ता खचला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली होती. येथील खचलेल्या रस्त्याचे काम होणे गरजेचे असल्याने यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांनी २५ लाखांचा निधी मंजूर केला होता.
भाचरवाडी येथील खचलेल्या या रस्त्याच्या ठिकाणी दगडी गेबिन वॉल होणार असून, लांबी १८ मीटर, रुंदी ३ मीटर आणि उंची चार मीटर याप्रमाणे त्याची रचना असणार आहे. दगडी गेबिन वॉल उभारणीनंतर त्याच्या आतमध्ये भराव टाकून खडीकरण आणि डांबरीकरण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सदरचे काम सुरू झाले असून, ते लवकरात लवकर पूर्ण होण्याबरोबरच दर्जेदार होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
याबाबत महेश सावंत म्हणाले, ‘भाचरवाडी येथील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी होणाऱ्या गेबिन वॉलसाठी लागणारे साहित्य पुणे येथून मागवावे लागते. ते वेळेत मिळाले नसल्याने काम सुरू करण्यास विलंब झाला. सध्या काम सुरू केले असून, १५ दिवसांत काम पूर्ण करणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com