कोतोलीच्या राजर्षी शाहू पतसंस्थेचा 
वर्धापन दिन उत्साहात

कोतोलीच्या राजर्षी शाहू पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

कोतोलीच्या राजर्षी शाहू पतसंस्थेचा
वर्धापन दिन उत्साहात
कोतोली : कोतोली (ता. पन्हाळा) येथील राजर्षी शाहू पतसंस्थेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हनुमान उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष बळवंत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास पाटील उपस्थित होते. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असलेल्या या पतसंस्थेने अल्पावधीतच तीन कोटी ठेवी आणि नऊ कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली आहे. संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी संस्थेच्या ध्येयधोरणाबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे बळवंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्याक्ष राजाराम खोत संचालक मधुकर पाटील, जयसिंग लाड, बाजीराव पाटील, दादासाहेब शेलार, पी. आर. पाटील, सूर्यकांत बाऊचकर, मृणाल बचाटे, सुनील शेटे, मॅनेजर सागर चोरगे, कर्मचारी, कोलोलीच्या सरपंच पवित्रा कांबळे, विजय खोत, विश्‍वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com