Tue, Jan 31, 2023

शांतिनाथ धरणगुत्ते,हासीना मुल्ला यांची निवड
शांतिनाथ धरणगुत्ते,हासीना मुल्ला यांची निवड
Published on : 10 January 2023, 1:16 am
04025, 04026
....
धरणगुत्ते, मुल्ला यांची निवड
कुंभोज ः येथील ग्रामपंचायतीचे मुख्य लेखनिक शांतिनाथ धरणगुत्ते यांची महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागीय सचिवपदी निवड करण्यात आली. तर ग्रामपंचायतीच्या लिपिक हसीना मुल्ला यांची महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विवेक पोहेकर यांच्या हस्ते देण्यात आले. संघटनेची बैठक जावली मेंढा येथे झाली. या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष पंढरीनाथ मर्ढेकर, उपाध्यक्ष संतोष राऊत, कार्याध्यक्ष नागेश एंडोली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री.धरणगुत्ते व श्रीमती मुल्ला यांच्या या निवडीने कुंभोजसह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.