समुदाय आरोग्य अधिका-यांचा बेमुदत काम बंदचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुदाय आरोग्य अधिका-यांचा बेमुदत काम बंदचा इशारा
समुदाय आरोग्य अधिका-यांचा बेमुदत काम बंदचा इशारा

समुदाय आरोग्य अधिका-यांचा बेमुदत काम बंदचा इशारा

sakal_logo
By

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा
बेमुदत कामबंदचा इशारा
कुंभोज ः आयुष्मान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा २३ जानेवारीपासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, ४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभवावर बोनस देण्यात यावा, निश्चित वेतन व कामावर आधारित वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन ३६ हजार रुपये व कामावर आधारित चार हजार रुपये देण्यात यावे. या मागण्यांची पूर्तता १५ जानेवारीपर्यंत न झाल्यास १६ ला एक दिवसासाठी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, १७ पासून सर्व प्रकारची ऑनलाइन कामे बंद करण्यात येतील. त्यानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास २३ पासून समुदाय आरोग्य अधिकारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. संग्राम शिंदे यांनी दिली.