कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभिकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभिकरण
कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभिकरण

कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभिकरण

sakal_logo
By

04385
कुंभोज ः येथे निर्मला माळी, पूजा सपकाळ यांना पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले.
--------------------------
कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सुशोभीकरण
कुंभोज ग्रामसभेत निर्णय; निर्मला माळी, पूजा सपकाळ यांचा सन्मान
कुंभोज, ता. ३१ ः येथील सुपुत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांच्‍या पुतळा परिसरातील डिजिटल फलक काढणे, पुतळ्‍यासमोर विक्रेत्‍यांना आपल्‍या वस्‍तू विक्रीस मनाईबरोबरच पुतळा सुशोभीकरण तसेच बिरदेव मंदिर ‘ब’ वर्ग यात्रा स्‍थळासाठी प्रस्‍ताव तयार करण्‍याचा निर्णय आज झालेल्‍या ग्रामसभेत झाला.
सरपंच जयश्री जाधव अध्‍यक्षस्‍थानी होत्‍या. मंगळवारी (ता. २३) सभा तहकूब झाली होती. पंचायत समितीच्या माजी सदस्‍या निर्मला माळी, पूजा सपकाळ यांना ग्रामपंचायतीतर्फे पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले. तीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्‍या प्राथमिक केंद्राचे तत्‍काळ उद्‍घाटन करून ते रुग्‍णसेवेसाठी खुले करावे, अशी मागणी वसंत माळी यांनी केली. या दवाखान्‍याची अपूर्ण कामे, छताची गळती आदी कामांबाबत ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे, असा खुलासा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला. ग्रामपंचायतीच्‍या घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई करावी, त्यांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी सुभाष देवमोरे, कर्मवीर फौंडेशनचे अध्‍यक्ष सुशांत पाटील यांनी केली.
गावातील बहुतांश सीसीटीव्‍ही कॕमेरे बंद असून ते दुरुस्‍त करण्‍याची मागणी हष॔ल पाटील यांनी केली. दिव्‍यांगांच्‍या विविध सवलतींची माहिती दर्शवणारा फलक लावण्‍याची मागणी गणेश सपकाळ यांनी केली. यावेळी गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण नामे, पोलिस पाटील महंमद पठाण, तलाठी संभाजी घाटगे, डॉ. रिना अडसुळे, बाळासाहेब डोणे, वैभव जमणे, तसेच नागेश सपकाळ उपस्थित होते.
------------
घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी
गावात साचणारा कचरा टाकण्‍यासाठी जागा नसल्‍याने अनेक महिने घंटागाडी बंद होती. नितीन चौगुले यांनी सामायिक असणाऱ्या पडक्‍या विहिरीत कचरा टाकावा, असे सांगितले. यावर एकमत झाल्‍याने घनकचऱ्याचा प्रश्‍न तात्‍पुरता मार्गी लागला.