जिल्‍हास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनात स्‍नेहल हवलदार प्रथम

जिल्‍हास्‍तरीय विज्ञान प्रदर्शनात स्‍नेहल हवलदार प्रथम

05151
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन,
ग्रंथ महोत्सवाची कुंभोजला सांगता

कुंभोज, ता. ३ ः माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत गुरुकुल पब्लिक स्कूल यांच्‍या विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सव झाला. विविध गटातील विजेते अनुक्रमे : माध्यमिक व उच्च माध्यमिक गट : स्नेहल हावलदार (म्हाकवे हायस्कूल), विघ्नेश कोपार्डे (किसनराव मोरे हायस्कूल), शेखर रायजादे (कुमारभवन शेळोशी भुदरगड), उत्तेजनार्थ नेमिनाथ बाळागिरे (ताराबाई आण्णासो नरदे हायस्कूल, नांदणी), प्रतीक पाटील (वि.दी.शिंदे हायस्कूल गडहिंग्लज), उच्च प्राथमिक गट: तेजस अर्जुन (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर), सुजय सावंत (बाळासाहेब पाटील कौलवकर हायस्कूल कौलव), श्रावणी शिंदे (कौलव हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कौलव), उत्तेजनार्थ सृष्टी फुटाणे (शाहू कुमार भवन गारगोटी), श्रेया होगाडे (कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर इचलकरंजी) प्राथमिक शिक्षक गट : सतीश कुंभार (विद्यामंदिर बावेली गगनबावडा), शरद कुंभार कुमार (विद्यामंदिर तारदाळ), उत्तम पाटील (विद्यामंदिर बेलेवाडी काळम्मा), माध्यमिक शिक्षक गट प्रथम : प्रियांक पवार (आदर्श विद्यानिकेतन मिणचे), सुधीर कांबळे (शहीद जवान साताप्पा महादेव पाटील हायस्कूल, बेलेवाडी मासा), प्रदीप व्हरकट (श्रीराम हायस्कूल बावेली, गगनबावडा). प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट : नीलेश परीट (जवाहरनगर हायस्कूल इचलकरंजी), इम्रानखान जमादार (उत्तूर विद्यालय उत्तूर), विजय पाटील (किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सरवडे). दिव्यांग विद्यार्थी गट ः रिजवान सनदी (धरणगुत्ती हायस्कूल धरणगुत्ती), प्रसाद जाधव (पाराशर हायस्कूल पारगाव), ओंकार पाटील (गोखले विद्यालय कोल्हापूर). विजेत्यांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्‍याध्‍यापक संघाचे अध्‍यक्ष सुरेश संकपाळ, ‘कोजिमाशि’चे अध्‍यक्ष बाळ डेळेकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, ‘जवाहर’चे उपाध्‍यक्ष बाबासो चौगुले यांच्‍या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविले. मुख्याध्यापक सागर माने यांनी स्‍वागत, प्राजक्ता पाटील व उमा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com