आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा
आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा

sakal_logo
By

01282
महागाव ः दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रा. पी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक नांदुलकर, भीमराव भुईंबर, महेश पाटील आदी उपस्थित होते.
-----------
आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा
प्रा. पी. डी. पाटील; महात्मा फुले विद्यालयात शुभेच्छा समारंभ
महागाव, ता. २६ : दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. भविष्यात आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करणार आहे. हे याच परीक्षेवर ठरणार आहे. शिक्षकांनी वर्षभर भरभरून ज्ञान दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, असा सल्ला प्रा. पी. डी. पाटील यांनी दिला.
ते महागावच्या महात्मा फुले विद्यालयात दहावीच्या शुभेच्छा समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील होते. वर्षा तिळवले, प्रांजली पाटील, सोनल पाटील, ओमकार वाघराळकर, जोतिबा रेडेकर, अनिल पोवार, समर्थ पाटील यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भिमराव भुईबर, प्रकाश चौगुले, अशोक नांदूलकर यांनी मार्गदर्शन केले. अनिल हलकर्णीकर, संदेश कोकितकर, दयानंद सुतार, कुलदीप देसाई, रमेश कळविकट्टे, शिवाजी सुतार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष सुतार यांनी केले. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले. आभार एकता पाटील यांनी मानले.