फाली ( कृषी)उपक्रम प्रमाणपत्र वाटप

फाली ( कृषी)उपक्रम प्रमाणपत्र वाटप

01413
‘फाली’ कृषी उपक्रमांतर्गत
४० विद्यार्थ्यांना पारितोषिक
महागाव; ता. १८ : विद्यार्थ्यांनी भविष्यात शेती आणि शेती व्यवसायाकडे सकारात्मक बघावे. त्यासाठी ‘फाली’ संस्थेच्या माध्यमातून शाळेत प्रात्यक्षिकांचे धडे गिरवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातून विद्यार्थी व पालकांचा शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कृषी ज्ञान आत्मसात करावे; असे आवाहन अशोक नांदुलकर यांनी केले.
ते महागाव (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये फाली संस्थेच्या वतीने दोन वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाप्रसंगी बोलत होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. पी.डी. पाटील,शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल हलकर्णीकर होते. फाली उपक्रमामध्ये शाळेतील आठवी व नववीमधील प्रत्येकी ४० अशा एकूण ८० विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाते. यावेळी नववी पास झालेल्या व दोन वर्ष कोर्स पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थ्यांना पारितोषिक करण्यात आले. प्रकाश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. महेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी भीमराव भुईंबर, सुभाष सुतार, संदेश कोकितकर, एकता पाटील, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, सुवर्णा शेवाळे, किरण पाटील, लता देसाई, शांताराम वाघराळकर, शिवाजी सुतार, नरसू कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक प्रथमेश शेळके, सूत्रसंचालन प्रकाश चौगुले महेश तर आभार महेश पाटील यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com